प्रेम करताना

.
प्रेम करताना गोरे गोमटे चेहरे बघायाचे नसतात.
ते कुठवर आपली साथ देतील, याचे अंदाज बांधायचे असतात.
प्रेमात प्रेम तर माणसात माणुसकी, क्वचितच ठासुन भरलेली असते.
रात्र झाल्यावर सूर्य देवाला आकाशात किंचित देखील जागा नसते. 

कोणी प्रेमासाठी जगत, कोणी प्रेमासाठी मरत.
फरक एवढाच, कोणी जगुन मरत, तर कोणी मारुन जगत.

तुम्हाला जीवनात कोणत पात्र साकारायचे आहे, हे तुमच्या हातात असत.
नायक होण्याची सर्वांचीच धडपड .....
पण कधी कधी नायिकेला देखील, खलनायकी  वृत्तीच आकर्षण असत.
असो प्रश्न प्रत्येकाचा खासगी आहे, मी त्यात डोकाउन करणार काय.

पुढल्याच वळणावर एक गुलाबी फुल हसणार,
ठरलेले नेहेमीचे ते सवांद,
नकळत एक फुलपाखरू जाळ्यात गुरफटनार.
प्रेम करताना गोरे गोमटे चेहरे बघायाचे नसतात.


प्रेम करताना
दिनांक : ३० जानेवारी २००४, वेळ: १० :००  स.

0 comments:

Post a Comment

आपल्या अमूल्य वेळा बदल आभारी आहे.
आपला आभीप्राय लवकरच प्रकाशित केला जाईल.

धन्यवाद !!
सुजय खांडगे

TourdeFarm - India's First Agritourism & Farmstay Portal


TourdeFarm - India's First Agritourism & Farmstay Portal


  © माझ्या मराठी कविता © 2010-2016 by Sujay Khandge - Digital Marketing Expert Pune Best Marathi Kavita Blog

Back to TOP