अभ्यास रात्र

दिवस असायचे अभ्यासाचे
रात्रीच्या जागण्याचे
जागे ठेवायला स्वताला
गरम गरम चहाचे पेले
तर कधी सिगारेटचे धुपारे
अभ्यासा व्यतिरिक्त विषय देखील  निघायचं
कुठल्या न कुठल्या पोरीसाठी
प्रत्येक जण प्रत्येक रात्री झुरायचा
रात्रीच्या भुकेची बातच और
कधी उरलेला डबा, तर कधी
बिस्कीटचे पुडे खाऊन काढायचे जोर
अभ्यास बाजूला ठेऊन गप्पा रंगायच्या
पहाटे चिमण्या चीवचीवल्यावर
आमच्या बैठकी हलायच्या
तेंव्हा अभ्यास जागच्या जागी असायचा
रोज दुपारी झोपून उठल्यावर
प्रत्येक जण अभ्यासाच्या रात्रीची वाट बघायचा ....


कवी सुजय .. 
अभ्यास रात्र 
                                                    दिनांक : ९ एप्रिल २००१, वेळ: ९:१५ रात्र

0 comments:

Post a Comment

आपल्या अमूल्य वेळा बदल आभारी आहे.
आपला आभीप्राय लवकरच प्रकाशित केला जाईल.

धन्यवाद !!
सुजय खांडगे

TourdeFarm - India's First Agritourism & Farmstay Portal


TourdeFarm - India's First Agritourism & Farmstay Portal


  © माझ्या मराठी कविता © 2010-2016 by Sujay Khandge - Digital Marketing Expert Pune Best Marathi Kavita Blog

Back to TOP